बीबी का मकबरा


बीबी का मकबरा ही मुघल सम्राट औरंगजेबच्या मुलाने आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ मकबरा बांधलेला आहे. औरंगाबाद येथे बांधलेली भव्य कबर आहे.या महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानीची कबर आहे. ही कबर औरंगजेबाच्याच काळात बांधलेली आहे.परंतु ही प्रतिकृती मलिकाच्या मुलाने आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये आपल्या आइच्या स्मरणार्थ बनविली आहे. मकबरा हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर,संगमरवर आणि काही पांढर्‍या मातीपासुन बनविलेला आहे.ज्यास स्टक्को प्लॆस्टर असे म्हणतात. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला आहे. मकबर्‍यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजुने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. कबरीची रचना करतांना वरील छतांच्या खिडक्यांची अशी रचना केलेली आहे की त्या कबरीवर दिवसा सुर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश त्या कबरीवर पडतो. मकबर्‍याचा घुमट संगमरवरी दगडाचा बनलेला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजुने दोन ताळी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी मिनारावर जाता येत होते.

Category: 1 comments

1 comment:

Post a Comment