घृष्णेश्वर


घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिव मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे.
लाल पाषाणात अप्रतिम कोरीव काम केलेले हे मूळ मंदिर पुरातन असून, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जिर्णोद्धार केला तसेच १८ व्या शतकात अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याने ते अद्यापही चांगल्या अवस्थेत आहे.
Category: 1 comments

1 comment:

Rahul Balsaraf said...

hey dnt stop na..keep on writing..

Post a Comment